आव्हाने

एकविसाव्या शतकातील अनेक आव्हाने आमच्यासमोर आहेत. विद्यार्थींना सुसंस्कृत, सशक्त व राष्ट्रप्रेमी नागरीक आम्हाला घडवायचे आहेत. संस्थेला अजून कित्येक प्रकल्प हाती घ्यावयाचे आहेत. नवीन वर्ग खोल्या, इमारती, कार्यशाळा, प्रयोगशाळा, शैक्षणिक साधने उपकरणे, नव्या, शैक्षणिक योजना, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालाय, क्रीडांगण विकास या व अशा अनेक पायाभूत सोयी उपलब्ध करावयाच्या आहेत.

जगात इंग्रजीचे महत्व लक्षात घेऊन इंग्रजी माध्यमाची सोय करणे विचाराधीन आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचा विस्तार करावयाचा आहे. वाढती महागाई व शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात दिवसे दिवस होते जाणा-या कपातीमुळे ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या आमच्या सारख्या संस्थांनां आर्थिकदृष्ट्या कठीण होत जात आहे. देवगड एज्युकेशन बोर्ड ही केवळ आणि पूर्णतः शैक्षणिक संस्था आहे. राजकीय भेद व जातीय भेदापासून पूर्णपणे अलीप्त आहे. आमचे कार्य हिमालयाच्या उतुंग शिखराप्रमाणे अचल, निर्मल व मंगल असावे हे तत्व आम्ही अंगिकारले आहे. संस्थेचा आतापर्यंतचा कारभार व लौकिक पाहून व बोर्डाने चालविलेल्या शाळांची प्रगति पाहून संस्थेला अनेक उदारधीनी देणग्या देऊन सहाय्य केलेले आहे.

संस्थेच्या विविध योजना व उपक्रम पूर्ण होण्यासाठी माजी विद्यार्थी, सभासद, हितचिंतक, शिक्षणप्रेमी, सेवाभावीव्यक्ती व संस्था यांनी उदारहस्ते योगदान द्यावे असे आम्ही आवाहन करीत आहोत. तसेच त्यांनी इतर परोपकारी व्यक्ती व संस्था यांच्या द्वारेही शक्य ते आर्थिक सहाय्य संस्थेला मिळवून द्यावे अशी विनंती आहे. आपणा सर्वांच्या सदिच्छेने व सहकार्याने देवगड एज्युकेशन बोर्डाची शिक्षण प्रसाराची व उन्नतीची स्वप्ने साकार होणार आहेत.