daboard

साध्य उद्दीष्टै

शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूलचे माजी मुख्याधापक कै. डॉ. शं. अ. टेंगशे, यांना सन १९६५ साली सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्काराने राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरवून सन्मानित करण्यात आलेल आहे.

आमच्या शाळांतील 3 शिक्षकांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, ७ शिक्षकांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार व १० शिक्षकांना विविध स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आमच्या दोन्ही शाळांचे शालांत परिक्षेचे निकाल समाधानकारक असून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. आमच्या शाळेतील मुलांनी विविध स्पर्धा व परीक्षामध्ये जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेले आहे. आमचे काही विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने चमकले आहेत. देवगडला “गुरुदक्षिणा” व वाड्याला “तात्त्या भिडे सभागृह” अशा प्रशस्त सभागृहाची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. दोन्ही शाळांत व्यायामशाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रिडासाहित्य ई. सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

संस्थेने देवगड येथे विनाअनुदान तत्वावर शिशुवर्ग ते इ. ४ थी पर्यंत “मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा” सन २००० पासून यशस्विरीत्या चालवलेली आहे. व्यवसायिक तंत्र शिक्षणाची गरज लक्षात घेउन संस्थेने २००६ पासून डिझेल इंजिनरिंग, फॅशन डिझायनिंग व तारयंत्री या तीन ट्रेडना सरकारी मान्यता घेऊन तंत्रशिक्षणाची सोय देवगड येथे उपलब्ध करून दिलेली आहे. आधुनिक जगात विविध खेळांना महत्व प्राप्त झाले असून त्यांना व्यावसायिक स्वरूपही प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रिडाविकास योजने अंतर्गत देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या क्रिडांगणावर सुसज्ज क्रिडासंकुल उभारण्याच्या प्रस्तावास संस्थेने मान्यता दिलेली आहे.

उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने सन २०१३ पासून देवगड येथे कला, वाणिज्य, व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरु केलेले आहे. संस्थेने आतापर्यतच्या वाटचालीत अनेक नवीन शैक्षणिक उपक्रम राबविलेले आहेत. शिशुवर्गापासून, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, सेमी इंग्रजी माध्यम, संगणक शिक्षण, संगीत शिक्षण, व्यवसायाभिमुख तंत्रशिक्षण अशा विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.